बँकाच्या बुडीत कर्जात घट – आरबीआयचा अहवाल

मुंबई वृत्तसंस्था | कोरोना कालावधीत भारतीय अर्थव्यवस्थेला बसलेल्या धक्क्यातून अर्थव्यवस्था सावरताना दिसत असून बँकांचे एनपीए अर्थात बुडीत कर्ज ८.२ टक्क्यांवरून घटून आता ६.९ टक्क्यांवर आलं असल्याचं आरबीआयने त्यांच्या अहवालात नमूद केलं आहे.

बँकांच्या उत्पनातील स्थिरता आणि खर्चातील घट यामुळे रिटर्न ऑन असेट्समध्ये सुधारणा होऊन बुडीत कर्जांचे प्रमाण कमी झालं असल्याचं आरबीआयच्या या अहवालात सांगितलं. देशात डिजिटर करन्सीच्या वापरात वाढ झाली असून आरबीआयच्या पतधोरणात कोणताही बदल करण्यात आलेला नाही असंही अहवालात सांगण्यात आलं आहे.

Protected Content