मुंबई प्रतिनिधी । राज्यात एका महिनाभरात दुधाच्या प्लास्टीक पिशव्यांवर बंदी येणार असल्याची माहिती आज पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली.
राज्यात आधीच प्लॅस्टीक बंदी असली तरी दुधाच्या पिशव्या मात्र अद्यापही सुरू असल्याकडे काही आमदारांनी लक्ष वेधले होते. यावर उत्तर देतांना पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी येत्या महिन्या भरात राज्यातील दुधाच्या पिशव्यांवर बंदी येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा केली. राज्यात प्रत्येक दिवसाला एक कोटी पिशव्या दुधासाठी वापरल्या जातात. यातून दररोज तब्बल ३१ टन कचरा निर्मित होत असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. पर्यावरण मंत्रांचा हा निर्णय स्वागतयोग्य आहे. तथापि, प्लॅस्टीकच्या पिशव्यातून येणारे दूध-ताक आदींना आता पर्याय कोणता हा प्रश्न उभा राहणार आहे.