एकनाथराव खडसेंची विधान परिषदेवर वर्णी लागायला पाहिजे होती : ना. गुलाबराव पाटील

 

जळगाव (प्रतिनिधी) एकनाथराव खडसे यांच्या सारख्या अनुभवी नेत्याची वर्णी विधान परिषदेवर लागायला पाहिजे होती. मला तशी अपेक्षा देखील होती. परंतू आता यावर अधिक बोलेने योग्य होणार नाही, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. ते शहरातील बसस्थानकात तामीळनाडू येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या बसेसचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते.

 

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे तामीळनाडू येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या बसेसचे आज सकाळी मध्यवर्ती बसस्थानकात आगमन झाले. यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना विधान परिषदसाठी डावलण्यात आल्याबाबत प्रतिक्रिया विचारली. त्यावर ना. पाटील यांनी सुरुवातीलाच यावर बोलेने योग्य नाही म्हणत खडसे यांच्या सारख्या अनुभवी नेत्याची वर्णी विधान परिषदेवर लागायला पाहिजे होती. मला तशी अपेक्षा देखील होती. यावर अधिक बोलणे उचित नाही. कारण आपल्या हातात काही नाहीय , अशी प्रतिक्रिया दिली. खडसे यांना कॉंग्रेसने ऑफर दिली होती, या प्रश्नावर ना. पाटील हे म्हटले की, खडसे यांचा विधानसभेतील प्रदीर्घ अनुभव आणि इकडे कॉंग्रेसकडे नसलेल्या नेतृत्वामुळे खडसे यांना ऑफर दिली देखील असेल. एवढेच नव्हे तर तुम्हाला काय वाटते? या प्रश्नावर ना. पाटील यांनी उत्तर दिले की, खडसे साहेबांचा सभागृहातील अनुभव बघता त्यांना संधी मिळायला हवी होती, अशी प्रतिक्रिया दिली.

Protected Content