जम्मू काश्मीरमध्ये जमात-ए-इस्लामीवर केंद्राकडून बंदी

11

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय गृहमंत्रालयाने जम्मू काश्मीरमधील ‘जमात-ए-इस्लामी’ या संघटनेला बेकायदेशीर घोषित करत बंदी घातली आहे. दरम्यान, या संघटनेशी संबंधित अनेकांना अटक केल्याचे देखील कळते.

जम्मू काश्मीरमधील ‘जमात-ए-इस्लामी’ या संघटनेचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे कारण देत गृहमंत्रालयाने या संघटनेवर बंदी घातली आहे. जमात-ए-इस्लामीकडून जम्मू काश्मीरमधील तसेच इतर ठिकाणी असलेल्या अतिरेकी संघटनांना मदत केली जात असल्याचा आरोप आहे. तरी, काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय सुरक्षा बैठक पार पडली. त्यानंतर अधिसूचना जारी करुन जमात-ए-इस्लामी जम्मू कश्मीर संघटनेवर बंदी लावण्यात आली आहे.

Add Comment

Protected Content