Home Cities चोपडा चोपडा येथे गुरूपौर्णिमेनिमित्त सत्संगाचे आयोजन

चोपडा येथे गुरूपौर्णिमेनिमित्त सत्संगाचे आयोजन


balyogi maharaj

चोपडा प्रतिनिधी । गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने शहरात 16 जुलै रोजी प.पु. संत श्री श्री १००८ महामंडलेश्वर बालयोगीजी महाराज यांच्या अमृतवाणीतुन भव्य सत्संगाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला चोपडा तालुक्यातील हजारो भाविक भक्त हजर राहणार आहेत. १६ रोजी सकाळी 9 वाजता चोपडा कृउबा समितीच्या आवारात संत बालयोगीजी महाराज हे आपल्या भक्तासाठी सत्संग करणार असून भाविक भक्तांच्या आग्रहाने यावर्षी गुरुपौर्णिमा बाजार समितीत साजरी केली जाणार आहे. दुपारी 12 वाजेपासून भंडाऱ्याचे आयोजन समितीद्वारा करण्यात आले आहे. सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहाने संत बालयोगीजी महाराज गुरुपौर्णिमा उत्सव समिती साजरा करत आहे. लाखो भाविकांनी त्याच्या दर्शनासाठी यावे व भंडाऱ्याचे लाभ घ्यावा, असेही आवाहन चोपडा तालुका जय नारायण परिवाराच्य वतीने करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound