मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेला लागलेली गळती कायम असून आज बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी असणार्यांनी शिंदे गटात प्रवेश घेतला आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सावली अशी ओळख असलेले त्यांचे सहायक चंपासिंह थापा हे देखील एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चंपासिंह थापा यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला. बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहायक म्हणून त्यांची ओळख होती.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सेवेकरी म्हणून चम्पासिंग थापा हे ओळखले जातात. बाळासाहेब हे राज्यात दौरे किंवा सभेनिमित्त जायचे. त्यावेळेस त्यांच्यासोबत थापा हे सावलीसारखे उभे असायचे. बाळासाहेबांच्या प्रकृतीची काळजी घेणे, त्यांना औषधे देणे आणि जेवण देणे अशी कामे ते करीत होते. मातोश्रीमधील एक सदस्य म्हणून ते ओळखले जायचे.
सोमवारी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील टेंभीनाका येथील देवीच्या मिरवणुकीदरम्यान भेट घेऊन त्यांना पाठींबा दिला.