जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव-नशिराबाद रोडवर असलेल्या बालानी लॉन समोरुन तरुणाची ५३ हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबविल्याची घटना समोर आली आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, नशीराबाद शहरातील खालची अळी भागात जितेंद्र अशोक रोटे (वय-३४) हे वास्तव्यास आहेत. दिनांक ८ जुलै रोजी बालानी लॉन येथे आले होते. यादरम्यान त्यांची दुचाकी (एमएच १९ डीएल ९२०३) या क्रमांकाची दुचाकी बालानी लॉनच्या गेटसमोर उभी केली होती. रात्री पावणे १० वाजेच्या सुमारास परतल्यावर दुचाकी मिळून आली नाही. दोन ते तीन दिवस सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी मिळून न आल्याने जितेंद्र रोटे यांनी सोमवारी नशीराबाद पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गजानन देशमुख हे करीत आहेत.