मुंबई वृत्तसंस्था । संजय लीला भन्साळी लवकरच एक चित्रपट घेऊन येत असून ‘बालाकोट एअरस्ट्राइक’वर चित्रपट बनवणार आहे. चित्रपटाची अधिकृत घोषणाही करण्यात आली आहे. या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक ठरले असले तरी चित्रपटात कोण कलाकार दिसणार हे मात्र अद्याप जाहीर करण्यात आले नाहीय.
निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या चित्रपटाची घोषणा केली आहे. याबाबत बोलताना संजय लीला भन्साळी म्हणाले, ‘बालाकोट एअर स्ट्राइक ही घटना आपल्या देशातील शौर्य, देशभक्ती आणि देशप्रेमाच प्रतीक आहे. हा चित्रपट भारतीय सैन्यातील शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्याचा माझा प्रयत्न आहे.’ भारतीय हवाई दलानं दाखवलेल्या या शौर्याची गाथा मोठ्या पडद्यावर मांडण्यासाठी दिग्दर्शक अभिषेक कपूर सज्ज आहे. ‘भारताच्या इतिहासात नाव कोरली गेलेली ही घटना आहे. या ऐतिहासिक घटनेवर आधारित चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मला मिळणं हा मी माझा सन्मान मानतो. बालाकोट हल्ल्याच्या बातम्या पाहताना देशवासीयांच्या भावना काय होत्या हे मी जाणतो. त्यामुळे मी चित्रपटाला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन’ असे त्यांनी सांगितले.