सावदा ता. रावेर प्रतिनिधी । शहरातील बखतपुरी गोसावी समाधी ट्रस्ट, सोमवारगिरी मढी, तीर्थक्षेत्र विकास योजनेबाबत निधी मंजूर करावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रावेर तालुक्यातील सावदा येथील बखतपूरी गोसावी, समाधी ट्रस्ट, सोमवारगिरी मढी या पुरातन मधील मंदिरामध्ये महाराजांच्या जयंतीनिमित्त यात्रा महोत्सव आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमात हजारो भाविक सहभागी होतात. मंदिर फार पुरातन व जागृतस्थान मानत असल्याने पंचक्रोशीतच नव्हे तर लांबून अनेक भाविकभक्त दर्शनासाठी येतात. लांबून आलेल्या भाविक भक्तांसाठी सोई सुविधा होणेसाठी सदर संस्थान मंदीरास तिर्थ क्षेत्र स्थळ म्हणून दर्जा मिळावा, जेणेकरून मंदिरास तिर्थक्षेत्र पर्यटन विकास योजनांच्या माध्यमातून सोईसुविधा करण्यासाठी ५० लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे.
याप्रसंगी अतुल नेमाडे, महेश भारंबे, नगरसेविका मीनाक्षी कोल्हे, कुशल जावळे, किशोर बेंडाळे, किरण पाटील, हरीसिंग परदेशी यांनी पुढाकार घेतला आहे. वरील काम हे तर तत्काळ मार्गी लावू असे आश्वासन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.