नवी दिल्ली-वृत्तसेवा | भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान बजरंग पुनियाने शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांच्यासाठी दोन पानी पत्र लिहिले. त्याने आपल्या मागण्या ऐकल्या जात नसल्याने पद्मश्री पुरस्कार परत करत असल्याचे म्हटले आहे या वर्षात सुरुवातीपासून भारताचे स्टार कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघातील रोज बृजभूषण शरणसिंग यांच्या हुकूमशाहीच्या विरोधात आंदोलन करत आहेत.
बृजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे यासाठी दिल्लीत बजरंग सह साक्षी मलिक, विनेश ओघाट हे स्टार कुस्तीपटू ही आंदोलन करत होते. आज बजरंग पुनीयाने पद्मश्री पुरस्कार व पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासाबाहेर पद्मश्री पुरस्कार आणि पत्र स्त्यावर ठेवले. हा पुरस्कार घेऊन जाण्याची विनंती पोलीस त्याला करत होते, परंतु बजरंग त्याच्यावर ठाम दिसला.