जळगाव प्रतिनिधी । घरकूल गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी नाना वाणी, राजा मयूर यांच्या व्यक्तीरिक्त इतर आरोपींना आज जामीन मंजूर करण्यात आला आहे.
घरकूल प्रकरणी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. यातील पहिल्या टप्प्यात काही जणांना जामीन मंजूर करण्यात आला होता. यानंतर अलीकडेच माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनादेखील वैद्यकीय उपचारासाठी अंतरीम जामीन मिळाला होता. या पार्श्वभूमिवर, आज न्यायालयाने नाना वाणी, राजा मयूर यांच्या व्यतिरिक्त प्रदिप रायसोनी, विजय कोळी, महेंद्र संजू सपकाळे, सुधा बंडू सपकाळे, लिना अनिल वाणी, साधना कोगटा आणि अलका लढ्ढा या आरोपींना जामीन मंजूर केल्याचे वृत्त आहे. माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान नाना वाणी आणि राजा मयूर यांनी जामीनासाठी कोणताही अर्ज केलेला नव्हता.