चाळीसगाव येथील विश्वकर्मा सेना कारागिर युनियन तर्फे मागण्याचे निवेदन

chalisagaon 3

 

चाळीसगाव प्रतिनिधी । पारंपारिक लाकडी व अल्युमिनीयम सेक्शन कला काम करणाऱ्या सेव विश्वकर्मा कारागीर बांधवावर सॉ मिल व अल्युमिनियम होलसेल विक्रेते यांच्याकडून होणारा अन्याय थांबविण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र विश्वकर्मा सेना कारागिर युनियन यांच्यावतीने येथील तहसीलदार यांना करण्यात आली आहे. यावर लवकर निर्णय न मिळाल्यास युनियन परिवारासह साखळी पध्दतीने उपोषण करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटल्याप्रमाणे, महाराष्ट्र विश्वकर्मा सेना कारागिर युनियन विश्वकर्मा कारागिर बांधव युनियनच्या वतीने विनंती करण्यात आली आहे की, प्रचलित कायद्यानुसार सॉ मिल व आल्युमिनीयम सेक्शन होलसेल मालकांना केवळ कच्चा माल विक्री करण्याचा अधिकार दिला असून सद्याची स्थिती मात्र सॉ मिल व आल्युमिनीयम होलसेल विक्रेते सरासरपणे लाकडी वस्तु व काचेच्या खिडक्या स्वत: तयार करुन विक्री करत आहेत. यामुळे कारागार वर्गावर सर्वात मोठा अन्याय होतोय. तसेच वस्तुचा दर्जा अत्यंत कमी असुन त्यांच्याकडून सुरु असणाऱ्या विक्रीमुळे पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या कारागीर वर्गावर व बांधवांवर रोजगार मिळण्यास अत्यंत अडचणी निर्माण होत आहे. तसेच याच्या परिणामी त्यांच्या कुटुंबावर होत असून उपासमारीची वेळ आली आहे. या परिणामामुळे सर्व कारागीर उद्योग धंदा अभावी व्यसनाच्या आहारी जाऊन आत्महत्येचा अवलंब करीत आहे. या अन्यायास तात्काळ आळा बसून विश्वकर्मा कारागीर बांधवांचा हा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आपल्या विभागामार्फत सॉ मिल व होलसेल आल्युमिनीयम विक्रेता यांच्यावर कायदेशीर 57 वचक निर्माण करण्याच्या उद्देशाने १५ दिवसाच्या आत उचित कार्यवाही करुन तालुक्यातील सर्व विश्वकर्मा कारागीरांवर होणारा अन्याय थाबविण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र विश्वकर्मा सेना कारागिर युनियन यांच्यावतीने येथील तहसीलदार यांना करण्यात आली आहे. यावर लवकर निर्णय न मिळाल्यास युनियन परिवारासह
साखळी पध्दतीने उपोषण करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.

Protected Content