जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गणित विभाग आणि रामराव आदिक अभियांत्रिकी महाविद्यालय, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने २३ ते २८ डिसेंबर या कालावधीत ‘सायलॅब प्रमाणपत्र’ अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
या अभ्यास वर्गाचे उदघाटन बायोकेमेस्ट्रि विभाग प्रमुख प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्याहस्ते करण्यात आले. पर्यांवरणशास्त्र विभाग प्रमुख प्रा.एस.टी. इंगळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी गणितशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.एस.आर.चौधरी, अभ्यास वर्गाचे प्रमुख वक्ते रामराव आदिक अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ.नरेंद्रकुमार दसरे, डॉ.प्रीतम वाणी हे उपस्थित होते. प्रास्ताविक अभ्यास वर्गाचे समन्वयक प्रा.किशोर पवार यांनी केले. सूत्रसंचालन कु.इरम खान हीने केले. डॉ.चिंतामण आगे यांनी आभार मानले. हा अभ्यासक्रम पुढील भविष्यातील संधीसाठी उपयोगी ठरणार आहे. वर्गास ५० विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी झाले आहेत.