बहिणाबाई चौधरी विद्यापीठात संवाद कार्यशाळेचे आयोजन

NMU 1

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने जागतिक दिव्यांग दिना निमित्त दिव्यांग विद्यार्थी संवाद कार्यशाळेचे आयोजन मंगळवार, ३ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील हे राहणार आहेत. यावेळी प्र.कुलगुरु प्रा.पी.पी.माहूलीकर, व्यवस्थापन परिषद सदस्य, दिलीप पाटील, प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही. पवार यांची उपस्थिती राहणार आहेत. कार्यशाळेचे आयोजन अधिसभा सभागृहात सकाळी १०.३० वाजता करण्यात आले आहे. यावेळी प्रा.सी.एस.पाटील, धरणगाव यांचे “बहिणाबाईंच्या काव्यातील जीवनवाद” या विषयावर व्याख्यान होणार आहे. “दिव्यांग विद्यार्थी सोयी-सुविधा-समावेशी शिक्षण” या विषयावर डॉ.राम भावसार मार्गदर्शन करणार आहेत. प्रभारी वित्त व लेखा अधिकारी डॉ.विवेक काटदरे हे “प्रेरणादायी जीवनाची अनमोल गाथा” या विषयावर संवाद साधाणार आहेत. प्र.कुलगुरु प्रा. माहुलीकर हे दिव्यांग कला महोत्सवा बद्दल माहिती देऊन खुली चर्चा करणार आहेत. कार्यशाळेस उपस्थित दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवास खर्चाची परिपूर्ती म्हणून प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असुन विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालय, परिसंस्था आणि प्रशाळांमधील नियमित शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थी-विद्यार्थिंनी या कार्यशाळेला उपस्थित रहावे. असे आवाहन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक, डॉ.सत्यजित साळवे यांनी कळविले आहे.

Protected Content