Home क्राईम बांबरूड येथे भरदिवसा सशस्त्र दरोडा; दोन लाखांचा ऐवज लंपास

बांबरूड येथे भरदिवसा सशस्त्र दरोडा; दोन लाखांचा ऐवज लंपास

crime-2

crime 4 3

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील बांबुरूड (राणीचे) येथील पंचायत समिती सदस्य यांच्या घरी भरदिवसा अज्ञात दोघांना सशस्त्र दरोडा टाकला. यात रोकड आणि सोने असे दोन लाखांचा ऐवज लुटून नेला.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील बांबरुड (राणीचे) येथील माजी आमदार दिलीप वाघ यांचे पुतणे आणि स्व.आप्पासाहेब ओ.ना.वाघ.यांचे नातु तथा पाचोरा पं.स.सदस्य ललितभाऊ राजेंद्र वाघ यांच्या राहत्या घरी सकाळी ११ वाजेच्या सुमारास २ तरुणांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना घडली असून यात ललित वाघ यांच्या पत्नीच्या हातावर वार करून जखमी करून मोठी रक्कम व सोने लुटून नेले आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून भरदिवसा दरोडा पडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.


Protected Content

Play sound