Home क्राईम अल्पवयीन मुलांचे कैद प्रकरण : बाबा नित्यानंद देश सोडून फरार

अल्पवयीन मुलांचे कैद प्रकरण : बाबा नित्यानंद देश सोडून फरार


nityanand baba 89 5
 

अहमदाबाद (वृत्तसंस्था) आश्रमात अल्पवयीन मुलांना कैद करून ठेवण्याच्या आरोप असलेला वादग्रस्त स्वयंभू बाबा नित्यानंद देश सोडून फरार झाला आहे. दरम्यान, आरोपी नित्यानंद विरोधात कर्नाटकात देखील बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.

 

गुजरात पोलिसांनी आश्रमात अल्पवयीन मुलांना कैद करून ठेवण्याच्या आरोपावरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात आश्रमातील दोन महिलांना अटक केल्यानंतर नित्यानंद देश सोडून पळून गेल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याच्या प्रत्यर्पणासाठी परराष्ट्र मंत्रालयासाठी संपर्क साधणार असल्याचे कळते. दरम्यान, नित्यानंद कॅरिबियन देश त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.


Protected Content

Play sound