जळगाव प्रतिनिधी । मूळव्याध व फिशरची व्याधी ही अतिशय वेदनादायक असून यामुळे अनेक रूग्ण त्रस्त झालेले आहेत. यावर जळगावातील धन्वंतरी मूळव्याध भगंदर व आयुर्वेदीक पंचकर्म रूग्णालयात अतिशय परिणामकारक व वेदनारहीत उपचार उपलब्ध आहेत. या रूग्णालयाचे संचालक डॉ. व्ही. एम. चौधरी आणि डॉ. भावना चौधरी यांच्याशी साधलेला हा संवाद आपल्यासाठी सादर करत आहोत.
सध्या जीवनशैलीत बदल झाल्यामुळे अनेक व्याधींचा प्रसार झाला आहे. यात मधुमेहासोबत मूळव्याध भगंदर, फिशर आदी विकारांचा समावेश होतो. यासाठी शल्यचिकित्सा हा उपाय असला तरी तो वेदनादायी आणि अर्थातच खर्चिक असा आहे. या पार्श्वभूमिवर, आयुर्वेदातील हजारो वर्षांपासून प्रचलीत असणार्या क्षार चिकित्सेचा वापर हा धन्वंतरी रूग्णालयात करण्यात येतो. यामध्ये क्षार चिकित्सेला पंचकर्माची जोड देण्यात आलेली आहे. डॉ. व्ही. एम. चौधरी आणि डॉ. भावना चौधरी यांच्या रूग्णालयात गत दोन दशकांपासून ही चिकित्सा पध्दती सुरू असून याचा असंख्य रूग्णांना गुण आला आहे. यात रूग्णांना कोणत्याही प्रकारची अॅलोपॅथी औषधे दिली जात नाहीत. तसेच यात कोणतेही ऑपरेशन केले जात नाही. रूग्णाला एक वा फार तर दोन दिवस अॅडमीट रहावे लागते. यानंतर त्याला १५ दिवसांची औषधी दिली जाते. ही औषधी घेतल्यानंतर रूग्णाला नंतर कोणताही त्रास होत नसल्याचे प्रतिपादन डॉ. व्ही.एम. चौधरी यांनी केले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे रूग्ण स्वत: अगदी चालत-फिरत राहू शकतो. तो अगदी स्वत:ची ड्रेसींग सुध्दा स्वत:च करू शकत असल्याचे ते म्हणाले. आणि ही चिकित्सा पध्दती फार खर्चीक नसल्याची माहितीसुध्दा डॉ. व्ही.एम. चौधरी यांनी दिली.
डॉ. भावना चौधरी म्हणाल्या की, मूळव्याधीच गुदद्वाराच्या बाहेर अथवा आतील भागात कोंब आलेले असतात. तर फिशरमध्ये आतील भागांमध्ये जखमा झालेल्या असतात. यातील महिलांना जास्त प्रमाणात फिशरचा त्रास होण्याचा धोका असतो. खरं तर या व्याधीबाबत डॉक्टरकडे जाण्याबाबत रूग्ण हा खूप संकोच करत असतो. यामुळे अनेकदा हा विकार प्रचंड प्रमाणात बळावल्यानंतरच डॉक्टरकडे जावे लागते. यामुळे कुणालाही हा विकार झाल्यास त्याने विना संकोचपणे याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अतिशय आवश्यक आहे. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे यासाठी आपल्या जीवनशैलीत अनुकुल बदल करणे आवश्यक असल्याचे मत डॉ. भावना चौधरी यांनी व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या, की आपण शरिराचे न ऐकता मनाचे ऐकून खात असतो. मात्र सकाळी चांगला नाश्ता, दुपारी जेवण आणि सायंकाळी हलके जेवण असल्यास कुणालाही मूळव्याधीसारख्या व्याधींचा त्रास होणार नाही. याला योग्य तो व्यायाम अथवा योगासनांची जोड दिल्यास उत्तम असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. तर खाण्यात अति तिखट अथवा तेलकट पदार्थ कमी असावेत असे अपेक्षित आहे. अर्थात, शरिरासाठी थोडे फार स्निग्ध पदार्थ आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. सर्वात महत्वाचे म्हणजे भोजनात द्रव पदार्थ म्हणजेच लिक्वीड डायट हे जास्त प्रमाणात असावेत. या संदर्भात कुणीही रूग्ण आपल्याशी संपर्क साधू शकतो असे आवाहन त्यांनी केले आहे.
संपर्क :
श्री धन्वंतरी मूळव्याध भगंदर व आयुर्वेदीक पंचकर्म हॉस्पीटल,
प्लॉट क्रमांक ४, डॉ. सी.जी. चौधरी हॉस्पीटलच्या जवळ,
प्रताप नगर, जळगाव
संपर्क क्रमांक : ०२५७-२२२५४६०
संकेतस्थळ : http://pilesayurved.com
पहा : आयुर्वेदीक क्षार पध्दतीबाबत डॉ. व्ही.एन. चौधरी व भावना चौधरी यांनी दिलेली सविस्तर माहिती.