महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी ; मुंबईत वृद्धाचा मृत्यू

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. दुबईहून मुंबईत आलेल्या 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. पीडित वृद्धावर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते.

 

मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या करोनाग्रस्त रुग्णाचे निधन झाले आहे. यामुळे भारतातील मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे. करोनाची लागण झालेल्या ६४ वर्षीय व्यक्तीवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. पण आज सकाळी त्यांचे निधन झाले. ही व्यकी घाटकोपरला वास्तव्यास होती. दुबईहून परतल्यानंतर करोनाची लागण झाली असल्याने त्यांना कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाले. दरम्यान, कोरोना व्हायरस जगातील 111 देशांमध्ये फोफावला आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात चार हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसला जगात महामारी म्हणून घोषित केले आहे. तसेच कोरोनाविरोधात संपूर्ण जगाने आता एकजूट होऊन लढावे, असे आवाहनही जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.

Protected Content