भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । 1 डिसेंबर 2023 जागतिक एड्स दिनानिमित्त Let comunity lead ( आता नेतृत्व व आघाडी समुदायांची) या वर्षाच्या थीमने विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय भडगाव ,अभिनव बहुउद्देशिय संस्थेच्या अभिनव प्यारामेडिकल इन्स्टिटयूट भडगाव, व श्री साई समर्थ इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ११ वाजता करण्यात आले.
सुरुवातीला भडगाव शहरात एच.आय.व्ही एड्स जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. – अभिनव प्यारामेडिकल इन्स्टिट्यूच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी असे एड्स जनजागृतीपर पथनाट्य बस स्थानक, व तहसील कार्यालय येथे रॅली समारोप कार्यक्रम वेळी सादर केले. यातून एड्स कसा होतो, एड्स होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, बाधित व्यक्तीशी समोपचाराणे वागावे, तपासणी व औषधोपचार डॉक्टरांच्या सल्ल्याने कसा घ्यावा, आधी संदेश पथनाट्यातून युवतीने दिले.
या वेळी तहसीलदार मुकेश हिवाळे,पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज जाधव , डॉ.समाधान वाघ, अभिनव संस्थेचे डॉ. दिलीप पाटील, संचालिका डॉ. सुवर्णा पाटील, चंदा पाटील, आयसीटीसी समुपदेशक नामदेव पाटील, फार्मशी कॉलेज चे प्राचार्य.महेंद्र पाटील, किरण अमृतकर, प्रदीप कोठावदे , दिपक चव्हाण, सलीम पटेल, समाधान पाटील ,नरेंद्र पाटील, आसिटीसीच्या रुपाली पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण रुग्णालयात जनजागृती –
एच आय व्ही एड्स नियंत्रण जनजागृती पोस्टर प्रदर्शन व प्रतिज्ञा कार्यक्रमाचे आयोजन ग्रामीण रुग्णालयात ही आज दि 1 रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ पंकज जाधव, डॉ.नितीन गेडाम, डॉ.सचिन पाटील, डॉ.वनश्रि पालवे, डॉ.स्वप्नील पाटील, डॉ.प्रियंका इंगोले, समुपदेशक नामदेव पाटील, किरण अमृतकर, प्रदीप कोठावडे, दीपक चव्हाण, मंदा हटकर, वंदना काळे, श्रीकांत चौधरी, कपिल पाटील, मीनाक्षी देशमुख, वैशाली वाघचौरे, सुनीता कोष्टी, निलेश कंडारे, मनोज वाघ, सुनील बागुल, हितेश माने, सलीम पटेल, समाधान पाटील, तसेच ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
यावेळी उपस्थित नागरिक व रुग्णांना डॉक्टर पंकज जाधव व समुपदेश नामदेव पाटील यांनी मार्गदर्शन केले. शासनाच्या वतीने त्याबाबत तपासणी व उपचार मोफत करण्यात येतात . गरजू नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा. बाधित रुग्णांची माहिती गोपी असते, कुटुंबात व बाहेर बाधित रुग्णास समोपचाराणे वागावे , हा आजार हस्तांदोलन, भेटीगाठीने पसरत नाही. तर अलैंगिक संबंध, एका एका पेक्षा जास्त व्यक्ती ने वापरलेले ब्लेड, सुई आदी पासून पसरतो. याबाबत काळजी घेणे . आदि महत्वपूर्ण माहिती डॉक्टर पंकज जाधव व समुपदेशक नामदेव पाटील यांनी दिली. सूत्रसंचालन किरण अमृतकर, प्रदीप कोठावडे, तर आभार मनोज वाघ यांनी मानले.