हरीविठ्ठल नगरात श्रीराम मंदीराच्या निधी संकलनासाठी भिलाटी वस्तीत जनजागृती

जळगाव प्रतिनिधी । प्रभु श्रीराम मंदीराच्या निधी संकलनासाठी शहरातील हरीविठ्ठल नगर परिसरातील भिलाटी वस्ती येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक व विश्व हिंदू परिषदेचे सचिव प्रशांत हरताळकर यांच्या उपस्थितीत जनजागृती व निधी संकलनास सुरूवात करण्यात आली. 

श्रीराम मंदीराच्या उभारणीसाठी समाजातील शेवटचा आर्थिक दुर्बल घटक यांच्याकडूनही खारीचा वाटा गेला पाहिजे या संकल्पनेतून आज उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे महानगर मंत्री दिपक दाभाडे यांनी सांगितले की, रामभक्तांना एकत्रीत येवून  श्रीराम मंदीर उभारणीसाठी आपण पण खारीचा वाटा द्यावा, यासाठी मी आपल्याकडे भिक मागायला आलो आहे. हे विचार मांडुन तेथिल समस्थ मंडळी अतिशय भावुक झाले. 

याप्रसंगी प्रांत प्रचारक स्वानंद झारे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री देवेंद्र भावसार, सहमंत्री श्रीराम बारी, जिल्हा संपर्क प्रमुख ललित खडके यांच्यासह दिपक दाभाडे, गणेश भावसार, दिनेश खारकर, आबा माळी, मुन्ना कोळी, दत्तू ठाकूर, मुकेश कोळी आदी उपस्थित होते.

 

Protected Content