यावल महाविद्यालयात सिकलसेल आजाराबाबत जनजागृती

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात ११ ते १७ डिसेंबर हा आरोग्य जनजागृती सिकलसेल सप्ताह शासनाने सुरू केला आहे. त्यानिमित्ताने महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार होते.

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्यवर तालुका आरोग्य अधिकारी राजु तडवी यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात शिक्षणाबरोबरच आरोग्य संपन्न राहणे महत्त्वाचे आहे. सिकलसेल हा आजार सातपुड्यातील आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. त्याची दक्षता घेण्यासाठी वेळोवेळी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणे गरजेचे आहे. सिकल सेल हा आजार सिकल पेशी रक्तक्षय किंवा ड्रेपॅनोसायटोसिस या नावाने ओळखला जातो. या आजारात लाल रक्तपेशींचा आकार विळ्यासारखा होत असल्याने लवचिकता कमी होते. लाल रक्तपेशीतील हिमोग्लोबिन जनुकाच्या उत्परिवर्तनामुळे तांबड्या पेशींचा आकार बदलतो असे सांगितले.

तर सुहास कुळकर्णी यांनी सांगितले की, सिकलसेल हा अनुवंशिक स्वरूपाचा वाहून येणारा आजार आहे. ह्या आजारापासून वेळेत सावध राहिले पाहिजे, त्याची लक्षणे, सांधे दुखणे, रक्त कमी होणे, थकवा येणे अशी आहेत. त्याचा रुग्णाला त्रास होतो. शरीरातील रक्तपेशी तांबड्या पांढऱ्या पेशी रक्त तयार करतात. अवयवापर्यंत पोहोचवतात गोल रक्तपेशी चंद्राकृती आकाराचे असतात, रक्त पेशीतील हिमोग्लोबिन सिकलसेल याची तपासणी करून घ्यावी, यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या सुविधा आहेत. रेल्वे व बस प्रवास मोफत आहे. शासकीय रुग्णालयामध्ये आरोग्य सेवा मोफत आहे. परीक्षेला पेपर ला बसताना अर्थात जास्त मिळतो परंतु या गंभीर आजाराची लक्षणे आढळल्यास अंगावर न काढता तपासणी करायला हवी व खेडोपाडी जनजागृती करायला हवी असे सांगितले.

यावेळी कार्यक्रमाला शुभांग तडवी (किनगाव) हे सिकल सेल आजारग्रस्त रूग्ण रक्त कमी वेळेवर गोळ्या घ्याव्या लागतात असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा एम. डी.खैरनार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शासनाने आरोग्य संदर्भात जनजागृतीच्या निमित्ताने शासकीय महाविद्यालय आश्रम शाळा वस्तीगृह खेडेगाव ह्या ठिकाणी आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी हे कार्यक्रमाच्या निमित्ताने मार्गदर्शनपर जनजागृती करतात. आदिवासी भागात आरोग्याची काळजी घेताना वेळोवेळी दक्ष राहिले पाहिजे, कॅरियर आणि सफर हे सिकलसेल आजाराचे दोन घटक आहेत. सफर ह्या घटकामार्फत रुग्णाला वेदना होते. तर कॅरियर या घटकाची रुग्णाला वेदना होत नाही. सफरसाठी लाल कार्ड व कॅरियर साठी पिवळे कार्ड असते पिवळे कार्ड वाले व्यक्तीने विवाह स्थळ जमवताना पहिले आरोग्य तपासणी करावी शरीरातील प्राणवाय आर बी सी गोल रक्तपेशी ऑक्सिजन पुरवठा कमी होतो त्यामुळे सिकल सेल आजारापासून वेळीच सावधानता बाळगायला हवी अंगावर न काढता उपचार करायला हवा असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा सुभाष कामडी यांनी केले तर आभार उपप्राचार्य डॉ. सुधीर कापडे यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला तुषार सोनवणे (वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय यावल), गायकवाड सर (आदिवासी विभाग विस्तार अधिकारी यावल), डी सी पाटील (आरोग्य विस्तार अधिकारी पंचायत समिती यावल), महाविद्यालयाचे कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. संजय पाटील, प्रा.हेमंत भंगाळे, प्रा.मनोज पाटील, प्रा.चिंतामण पाटील, प्रा.मुकेश येवले, प्रा.संजीव कदम, प्रा.आर.एस.तडवी, प्रा.डी.आर.पाटील, प्रा. सोनाली पाटील, प्रा.दानीश पटेल, प्रा निकिता पाटील मिलिंद बोरघडे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष ठाकूर, प्रमोद जोहरे, मनोज कंडारे, रमेश साठे यांनी परिश्रम घेतले.विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.

Protected Content