जळगाव प्रतिनिधी । शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज ९ मार्च रोजी शहरातील विविध मार्केटच्या ठिकाणी खान्देश कन्या व महिला विकास मंडळातर्फे आज कारोनाबाबत जनजागृती आणि मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले.
गेल्या महिन्याभरापासून जळगाव शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रूग्ण आढळून येत आहे. नागरीकांमध्ये कोरोना आजाराबाबत गांभीर्य लक्षात न घेतला शहरात बेफिकीर पणे निर्धास्त फिरत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आज जळगाव शहरातील खानदेश कन्या व महिला विकास मंडळातर्फे कोरोनाची जनजागृती करण्यात आली आहे. खानदेश कन्या महिला मंडळाच्या अध्यक्षा मंगला बारी यांच्या नेतृत्वामध्ये जळगाव शहरातील फुले मार्केट परिसर,गोलाणी मार्केट परिसर, टॉवर चौक चित्रा चौक या परिसरामध्ये जाऊन याप्रसंगी जनजागृती करण्यात आली. तसचे मास्क न वापरणाऱ्यांना समज देवून मास्क वापरण्याचे आवाहन देखील करण्यात आले. यावेळी खानदेश कन्या महिला मंडळाच्या ध्यक्ष मंगला बारी, वंदना बारी, छाया बारी, आशा रोकडे, संगीता बारी, छाया सोनवणे, रत्ना फुसे, पूनम बारी यांनी या जनजागृती कार्यक्रमात सहभाग नोंदविला.