नाचणखेडा येथे रूग्ण शोध पंधरवडा मोहीम

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील नाचणखेडा येथे वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशान्वये प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांच्या नियोजना नुसार संशयीत रुग्ण शोध पंधरवड विशेष रुग्ण तपासणी मोहीम राबविण्यात आली.

नाचणखेडा येथे अधिक रुग्ण व मृत्यचे प्रमाण अधिक असल्याने सदर मोहीम प्रशासनामार्फत राबवण्यात येत असल्याचे तहसीलदार एवं कार्यकारी दंडाधिकारी अरुण शेवाळे यांनी सांगितले.
या मोहिमेद्वारा प्रत्येक नागरिकांची थर्मल स्कॅन व पल्स ऑक्सिमीटर द्वारा तपासणी करण्यात आली.डॉ.जितेंद्र वानखेडे, डॉ. पुष्कराज नारखेडे, संदीप कुमावत, सुनील चौधरी, ललित केवट या ग्रामीण रुग्णालय पहुर टीमने संशयीत आढळून आल्यास तात्काळ त्यांची स्वब तपासणी डॉ. हर्षल चांदा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. विशेष तपासणी शिबिरात पहुर पोलीस प्रशासन, सरपंच राजेंद्र चौधरी, पोलीस पाटील,सर्व ग्रामपंचायत कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्र वाकोद चे सर्व आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांचे अनमोल सहकार्य लाभले.

गटविकास अधिकारी एन.आर.पाटील यांनी शिबिरासाठी हॉल व इतर सामुग्री ची उत्तरीत्या व्यवस्था करण्यात आली होती. याप्रसंगी प्रांताधिकारी दीपमाला चौरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेश सोनवणे व प्राथमिक आरोग्य केंद्र वाकोद चे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी सर्व नागरिकांचे समुपदेशन करून जास्तीत जास्त नागरिकांना तपासणीसाठी प्रवृत्त केले. या विशेष रुग्ण तपासणी मोहिमेत एकूण २०४ नागरिकांची तपासणी करून ५२ नागरिकांची स्वब तपासणी करण्यात आली.

Protected Content