वरणगाव प्रतिनिधी । वरणगाव येथील जेष्ठ पत्रकार मनोहर लोणे यांना उत्कृष्ट रिपोर्टर म्हणून १५ ऑगस्ट रोजी एम.सी.एन न्यूजकडून पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बुलढाणा जिल्ह्यात जळगांव जामोद येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. माजी मंत्री गुलाबराव गावंडे, जळगाव जामोद येथील लोकप्रिय आ.संजय जी कुटे, आदींच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. जळगाव, बुलढाणा, आकोला, यवतमाळ, नगर, अमरावती या जिल्ह्यामधुन ही निवड करण्यात आली आहे. मनोहर दादा लोणे हे पत्रकारितेत गेल्या 28 वर्षापासून सेवा देत आहे. मनोज लोंणे यांच्या मनमिळावू स्वभावामुळे आजी जनतेशी नाळ जोडलेल्या पत्रकार म्हणून ओळख आहे. देशदूत व बीसीएन व एमसीएन न्यूजचे पत्रकार आहे. त्यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वरणगाव शहर पत्रकार संघाच्या वतीने लोणेंचे अभिनंदन करण्यात आले.