जळगाव प्रतिनिधी ।शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दिव्यांग मंडळाचे कामकाज सुरु झाले आहे. कामकाजाविषयी सूचना असतील तर त्या कळवाव्या तसेच दिव्यांगांची गैरसोय टाळावी अश्या मागणीचे निवेदन जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे महाविद्यालयाचे अधिष्ठात डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीतर्फे दिव्यांग मंडळाच्या कामकाजाविषयी सविस्तर निवेदन गुरुवार ५ ऑगस्ट रोजी देण्यात आले. यावेळी दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याबाबतचे कामकाज आणखी सोपे व्हावे यासाठी अधिष्ठाता डॉ. रामानंद यांना विविध सूचना देण्यात आल्या. तसेच महाविद्यालय व रुग्णालयाच्या रिक्त असलेल्या ७२५ जागांविषयी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये मंत्रालयाकडे पाठपुरावा करू अशी माहिती यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दिव्यांग मंडळाचे कामकाज सुरु झाले आहे. कामकाजाविषयी सूचना असतील तर त्या कळवाव्या असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे निवेदन देत, दिव्यांगांची गैरसोय टाळावी अशी मागणी करीत सूचना कळवण्यात आल्या. या सूचनांवर विचार करू असे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले. तसेच दिव्यांग मंडळाचे कामकाज कसे चालते याची माहिती अधिष्ठातांनी दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रशासकीय व रुग्णालयीन विभागातील तांत्रिक व अतांत्रिक एकूण ७२५ पदे रिक्त आहेत. या पदांची काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती घेतली. त्याबाबत मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या मंत्र्यांकडे पाठपुरावा करून जळगावची शासकीय वैद्यकीय सुविधा उंचावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. प्रसंगी जळगाव ग्रामीण तालुका अध्यक्ष मनोज चौधरी, प्रमोद घुगे, समाधान पाटील, भाऊसाहेब सोनवणे, सोमनाथ माळी, भिकन सोनवणे, किरण चौधरी, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.