गर्दी टाळून संयमाने सण साजरे करा ; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन (व्हिडिओ)

जळगाव : प्रतिनिधी । रमजान ईद , अक्षयतृतीयता असो कि कोणतेही सण असोत सध्याच्या कोरोना काळात सर्वच धर्मियांना आमचे आवाहन आहे की त्यांनी सण उत्सव गर्दी टाळून संयमाने साजरे करावे , असे  आवाहन आज  जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले. 

जिल्ह्यातील एकूणच परिस्थितीबद्दल  लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलताना जिल्हाधिकारी अभिजित राऊत पुढे म्हणाले की , लोकांनी गर्दी न करता मिरवणूक किंवा प्रत्यक्ष भेटी टाळाव्या  फोन करून आप्तस्वकीयांना सदिच्छा द्याव्या . त्याचप्रमाणे लोकांचा कोरोना लसीकरणाला चांगला प्रतिसाद  मिळतोय म्हणून त्याचा  परिणाम असा होतोय की   लसीकरणासाठी गर्दी होतेय . ही गर्दी नियंत्रण करण्याचा प्रयत्न टोकन पद्धतीने केला जातोय जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख २१ हजार लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे आणि दुसरा ९८ हजार लोकांना  दिला गेला आहे . आमही सध्या ४५ वयाच्या पुढच्या लोकांचे लसीकरण वेगात करण्याचे प्रयत्न करीत  आहोत   सोबतच आता दुसरा डोस देण्याला प्राधान्य असेल १८ ते ४४ वयोगटाच्या लोकांना थोडे थांबावे लागणार आहे त्यासाठी सर्वांनी थोडा संयम बाळगावा आता पर्यंत जिल्ह्यातील २० टक्के लोकसंख्येचा पहिला डोस झालेला आहे आपल्या जिल्ह्यात दररोज ५० हजार लोकांना लस दिली जाण्याची   यंत्रणेची क्षमता आहे असेही ते म्हणाले. 

आता पर्यंत म्युकरमायकोसिसच्या त्रासासाठी आम्ही कार्यपद्धती निश्चित केली आहे जानेवारीपाऊणचं याचा अभ्यास करून औषधांची तयारी करून ठेवली आहे असे  सांगत  जिल्हाधिकारी अभिजित राऊत पुढे म्हणाले की , आतापर्यंत या त्रासाचे जिल्ह्यात १३ रुग्ण आढळले त्यापैकी ७ जण पूर्ण बरे होऊन घरी गेले आहेत शक्य तेवढ्या लवकर निदान आणि उपचार या त्रासातही महत्वाचे आहेत सामान्य रुग्णालयात या रुग्णांसाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे प्रतिकारशक्ती कमी असलेल्या आणि स्टिरॉइड  देण्याची  गरज असलेल्या जिल्ह्यातील सर्व रुग्णालयातील रुग्णांची माहिती सामान्य रुग्णालयाकडून दररोज घेतली जाते आहे पुढे गरज पडली तर   तारांबळ होऊ नये अशी काळजी आम्ही घेत आहोत असेही ते म्हणाले.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/488989762552770

Protected Content