यावल प्रतिनिधी । यावल नगरपरिषदेचे तत्कालिन मुख्याधिकारी बबन तडवी यांना लाच प्रकरणात अटक करण्यात आले आहे. त्यांच्या जागी चोपडा नगरपरिषेचे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी अतिरिक्त मुख्याधिकारी पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे. असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत आज काढले आहे.
सविस्तर माहिती अशी की, यावल शहरातील रस्त्याच्या कामाचे वर्क आर्डर काढण्यासाठी २८ हजाराची लाच प्रकरणात ३० जुलै रोजी लाचलुचपत विभागाने अटक केली होती. त्यामुळे यावल नगरपरिषेदच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार रिक्त आहे. त्यामुळे आज ४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आदेश काढून चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांच्याकडे अतिरिक्त यावल नगरपरिषदेचा पदभार देण्यात आला आहे. यासंदर्भात आज आदेश काढण्यात आले आहे.