आदर्श पोलीस पाटील भारती बेंडाळे यांचा सत्कार

पाचोरा, प्रतिनिधी ।  नुकत्याच आर्दश महिला पोलीस पाटील म्हणून गौरविण्यात आलेल्या भारती बेंडाळे(सावंत) यांचा राष्ट्रीय चर्मकार महासंघारार्फे सत्कार करण्यात आला.

 

राष्ट्रीय चर्मकार महासंघ, पाचोरा तालुका व शहर च्या वतीने आदर्श महिला पोलीस पाटील भारती बेंडाळे (सावंत)  यांचा एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कर्मचारी आघाडी जिल्हाध्यक्ष बी. बी. मोरे, कर्मचारी आघाडी शहराध्यक्ष प्रकाश रोझतकर, तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, तालुका सचिव उमेश सोनवणे, तसेच गाळण बु” चे सरपंच राजेंद्र सावंत, चि. जयेश सावंत उपस्थित होते. यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रीय चर्मकार महासंघ जेष्ठ नेते अनिल सावंत यांची कन्या  गायत्री सावंत हिस ८७ . ५० टक्के गुण मिळाल्याबद्दल तिचे देखील अभिनंदन व कौतुक करण्यात आले. भारती बेंडाळे (सावंत) या सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रीय चर्मकार महासंघ चे जेष्ठ नेते यांच्या पत्नी असून  गायत्री सावंत ह्या त्यांच्या कन्या आहेत.

 

Protected Content