मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । औरंगाबाद या शहराचं संभाजी नगर असं नामांतर करावं अशी मागणी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली यावर प्रस्ताव आणून ठराव मंजूर केला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. यात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. याविषयी संवाद साधतांना ते म्हणाले की, औरंगाबाद या शहराचं संभाजी नगर असं नामांतर करावं अशी मागणी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली यावर प्रस्ताव आणून ठराव मंजूर केला जाणार आहे
पुढे बोलतांना ते म्हणाले की, “उद्या होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत या बैठकीत अत्यंत आहेत. वांद्रे पूर्वेतील शासकीय वसाहतीतील सरकारी कर्मचाऱ्यांना तिथेच घरे मिळावीत यासाठी भूखंड वितरीत करावा.” ही मागणीही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आली असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली.