Home Cities जळगाव राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाने जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव

राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाने जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव


जळगाव प्रतिनिधी । राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात निर्लेखित शासकीय वाहन तसेच गुन्हे अन्वेषणात जप्त करण्यात आलेले ट्रक, मोटार सायकल तसेच इतर मुद्देमालाचा जाहीर लिलावाचे आयोजन करण्यात आले आहे.

लिलावात सहभागी होण्याकरीता २४ जून, २०२१ रोजी सकाळी ११ वाजता अटी, शर्ती व आवश्यक त्या बाबींची माहिती अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव यांचे कार्यालय, स्टेट बँक ऑफ इंडीया, मुख्य शाखेसमोर, जिल्हापेठ, जळगाव येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहिल. असे राज्य उत्पादन शुल्क सीमा झावरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


Protected Content

Play sound