पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. दरम्यान, २६ वाहनांचा दंड भरणा बाकी असल्याने सदर वाहनांचा तात्काळ लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती येथील तहसीलदार कैलास चावडे यांनी दिली आहे.
पाचोरा तहसिल कार्यालयाने सन – २०२१ – २०२२ या वर्षभरात अवैध वाळू वाहतुक विरोधी जोरदार मोहीम हाती घेवून अनेक अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली असून या वर्षात ४३ वाहनांचा ५८ लाख रुपये इतका दंड वसूल करून सरकार जमा करण्यात आला आहे. अजुनही तहसिल स्तरावर जमा २६ वाहनांचा दंड भरणा बाकी असल्याने सदर वाहनांचा तात्काळ लिलाव करून लिलावाच्या रकमेतून दंड रक्कम भरणा करण्यात येणार आहे. जप्त वाहनांचे मालक दंड भरणेसाठी टाळाटाळ करत असल्याने सदरचे पाऊल उचलण्यात आलेले आहे. अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे पाचोरा तहसिलदार कैलास चावडे यांनी केले आहे. सदर वाहनांची यादी परीवहन विभागास पाठविण्यात आली असून त्यावर लवकरच लिलावाची कारावाई करण्यात येणार आहे.