जळगाव प्रतिनिधी । अत्याचार झाल्यानंतर गर्भवती राहिलेल्या तरुणीच्या नवजात बाळाचा जन्मत:च मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज मंगळवारी २४ डिसेंबर रोजी दुपारी घटना घडली.
मुळ धरणगाव तालुक्यात राहणाऱ्या ही १८ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाले होते. त्यातून ती गर्भवती झाली होती. निराधार झाल्यामुळे ती आशादीप वसतीगृहात राहत होती. गर्भवती असल्याने प्रसूती कळा येत असल्याने २२ डिसेंबर रोजी तीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. २४ डिसेंबर रोजी तीने एक मुलास जन्म दिला. परंतू, काही वेळेतच या बाळाचा दुर्देवी मृत्यू झाला. तर तीची प्रकृती देखील खालावली आहे. गर्भात बाळाचे पालन-पोषण व्यवस्थित न झाल्यामुळे मृत्यू झाला असल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिलेल्या खबरीवरुन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मनोज पवार तपास करीत आहेत.