राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा प्रवक्तेपदी अतुल पाटील यांची निवड

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.

 

यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात मंगळवारी ८ मार्च रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविन्द्रभैय्या पाटील, जिल्हा निरिक्षक अविनाश आदीक यांच्या प्रमुख उपस्थित अतुल पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. अतुल पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदी निवड झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हा निरिक्षक अविनाश आदीक, तालुकाध्यक्ष प्रा . मुकेश येवले , ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे , चोपडा विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल साठे , राष्ट्रवादी आदीवासी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष एम बी तडवी सर , विजय प्रेमचंद पाटील , माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते यांच्यासह पक्षातील विविध पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

Protected Content