Home प्रशासन अतुल नेहते एमपीएससी परिक्षेत उत्तीर्ण

अतुल नेहते एमपीएससी परिक्षेत उत्तीर्ण

0
66

फैजपूर प्रतिनिधी । आसाराम नगर येथील अतुल नेहते यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परिक्षेत उत्तीर्ण होऊन पशुसंवर्धन अधिकारी श्रेणीत एलडीओ पदासाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल सर्व स्तरावरुन शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

अतुल नेहते हे प्राथमिक शिक्षक हेमचंद्र नेहते व शिक्षिका प्रभावती नेहते यांचे पुत्र आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, नातेवाईक, तसेच मित्रपरिवार यांनी त्यांच्या यशाचे कौतुक केले आहे. यावेळी अतुल नेहते याने सांगितले की, या यशामागे आई वडील व माझे शिक्षक यांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगितले.

 

 


Protected Content

Play sound