पतीच्या छळाला कंटाळून जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेहरूण परिसरात राहणाऱ्या विवाहितेने पतीच्या दारूच्या व्यसनाला आणि शारिरीक व मानसिक छळाला कंटाळून आज गुरूवारी ७ वाजता अंगावर रॉकेल ओतून जाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून यात विवाहिता ७० टक्के भाजले गेले आहे. जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ तिला दाखल करण्यात आले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, उज्वला संजय पाटील (वय-४५)  असे विवाहितेचे नाव आहे.  उज्ज्वला पाटील ह्या पती संजय पाटील, मुलगी नेहा आणि मुलगा विशाल यांच्यासह राहतात. मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान पती संजय पाटील यांना अनेक वर्षांपासून दारूचे व्यसन होते. त्यातच त्यांनी पत्नीचा शारिरीक व मानसिक छळ करण्यास सुरूवात केली. दरम्यान आज गुरूवारी २४ जून रोजी सायंकाळी ७.२० वाजेच्या सुमारास पती संजय पाटील हा दारू पिऊन आला होता. त्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद एवढा विकोपाला केला की विवाहितेने घरातील राकेलची बाटली आपल्या अंगावर ओतून घेत पेटवून घेतले. यात महिला ७० टक्के भाजल्या गेल्या आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नातेवाईकांनी तातडीने आग विझवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. या घटनेमुळे मेहरूण परिसात खळबळ उडाली आहे. दरम्यान, दोन वर्षापुर्वी उज्ज्वला पाटील यांचा मोठा मुलगा अक्षय संजय पाटील याने घरातील वादामुळे गळफास घेवून आत्महत्या केल्याची माहिती गल्लीतील नागरीकांनी सांगितले. विवाहितेची प्रकृती नाजूक असून त्यांना वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत कळसकर यांनी प्राथमोचार केले असून पुढील उपचारासाठी खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान उज्वला पाटील यांच्या नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात एकच आक्रोश केला. याबाबत जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत नोद करण्याचे काम सुरु होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!