जामनेर-भुसावळ रस्त्यावर रस्तालुटीचा प्रयत्न; वाहनांवर दगडफेक

जामनेर प्रतिनिधी । जामनेर भुसावळ रस्त्यावर गंगापूरी गावाच्या थोड्याच अंतरावर मुसाड तांडा परिसरात चोरट्यांनी रस्त्यावर दगड लावुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर त्यांनी रस्ता अडवत दगडफेक करत रस्ता लुटीचा प्रयत्न केला.

याबाबत घटनेचे प्रत्यक्षदर्शी लाईव्ह ट्रेंडस् न्युजचे जामनेर प्रतिनिधी राहुल इंगळे आपल्या मित्रासोबत त्यांच्या नातेवाईकांना भुसावळ येथे सोडण्यास गेले होते. रात्री साडेबाराच्या सुमारास आपल्या वाहनाने परत जामनेर येथे येत असताना मुसाड तांडा परिसरात रस्त्यावर दगड लावलेले होते समय सुचकता दाखवत गाडी वेगाने जामनेर काढली. गारखेडा गावात आल्यावर स्थानिक नागरीक व वाहन धारकांना त्यांनी थांबवून ठेवले रस्ता लुटीच्या प्रयत्न होत असल्याचे सांगत आपबीती सांगीतली. दरम्यान एका ट्रकवर दगडफेक केल्याने दगड हाताला लागल्यामुळे चालकाला हाताला मार लागल्याने जखमी झाला. जामनेर पोलीस स्टेशनला फोन करून कळवल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी हजर झाले व सदर ठिकाणी जावुन तपास केला. तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. 20 -22 वर्षानंतर झालेल्या या रस्त्ता लुटीच्या घटनेमुळे पुन्हा वाहन धारकांमध्ये दहशत पसरली आहे. चोरटे आसपासच्या परिसरातीलच असल्याचा अंदाज आहे.

Protected Content