सांगवी खुर्द येथील महिलेची विष घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सांगवी येथील अतिक्रमित टपरी पोलीस बंदोबस्तात काढत असतांना टपरीधारक महिलेने विष घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार घडल्यानंतर गावात खळबळ उडाली होती. यावल ग्रामीण रूग्णालयात महिलेला उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.  भिमाबाई लक्ष्मण पाटील (वय-५५) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील सांगवी येथील विठ्ठल रूखमाईचे मंदीराजवळ रविंद्र लक्ष्मण पाटील रा. सांगवी खूर्द यांची लहान किराण्याची टपरी आहे. बाजूला मंदीर असल्यामुळे किर्तन सप्ताह व लग्न समारंभचे कार्यक्रम होत असतात. त्याचप्रमाणे सकाळी आरती होते त्यावेळी दुकानावर गर्दी होत असते. कोरोनाच्या काळाता नियमांचे उल्लंघन केले जात नाही. त्यामुळे स्थानिक रहिवाशी यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली होती. त्यानुसार ग्रामपंचायतीने किरणादुकान मालक रविंद्र पाटील यांना टपरी हटविण्याबाबत ३ मार्च, १६ मार्च आणि २२ मार्च रोजी अशा तीन नोटीसा पाठविण्यात आल्या होत्या. परंतू आजपर्यंत त्यांनी किराणा टपरी हटविली नाही. त्यानुसार आज उपसरपंच आकाश धनगर यांनी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमित असलेले दुकान काढण्यासाठी आले. त्यावेळी दुकानदार रविंद्र पाटील यांची पत्नी भिमाबाई लक्ष्मण पाटील (वय-५५) यांनी विष घेवून दुकानासमोर झोपल्या. त्यामुळे अतिक्रमणाची कारवाई स्थगित करण्यात आले असून महिलेला यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

 

Protected Content