जमिनीच्या वादातून २२ वर्षीय तरूणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न; चार जणांवर गुन्हा दाखल

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्याच्या राजगड कोंढवळे गावात जमिनीच्या वादातून 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संभाजी खोपडे, तानाजी खोपडे, बाळू भोरकर, उमेश जयस्वाल या चार जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न, शिवीगाळ धमकावणे यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोंढवळे गावात जमिनीच्या वादातून 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संबंधीत तरुणीने आणि तिच्या आईने केला होता. ट्रॅक्टर आणि जेसीबी घेऊन दावा न्यायप्रविष्ट असलेल्या जमिनीचा बेकायदेशीर पध्दतीने ताबा घेण्यासाठी आलेल्या 25 ते 30 जणांनी जेसीबीच्या सहाय्याने अंगावर माती टाकून तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिनी आणि तिच्या घरच्यांनी केला आहे.

तरुणीने केलेल्या आरोपानुसार, नागरिक पोलिसांसह जमिनीचा ताबा घेण्यासाठी आले असताना तरुणी आणि त्या नागरिकांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. व्हिडिओत तरुणी कंबरेपर्यंत मातीमध्ये गाडली गेली असल्याचं दिसतंय. तरुणीने घडलेल्या घटनेबाबत वेल्हा पोलीस स्टेशनंमध्ये रीतसर लेखी तक्रार केली आहे. त्यानंतर राजगड पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसेच, या प्रकरणात 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

Protected Content