अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | संशयित चोरास अमळनेर पोलीसांनी कडोदरा पोलीसांच्या मदतीने अत्यंत शिताफिने अट्टल चोरट्यास ताब्यात घेतले आहे.
पोलीस स्टेशन हद्दीत जळगाव पोलीस अधिक्षक यांच्या सुचनेप्रमाणे विविध गांवाना ग्राम सरंक्षक पथके स्थापन करण्यात आले असून सदर ग्राम सरंक्षक पथकातील सदस्यांचे रात्रगस्त करण्याचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार दि. २७ मार्च २०२२ रोजी मंगरुळ ता. अमळनेर येथील रात्र गस्तकामी असणारे ग्राम सरंक्षण पथकास एक संशयित आढळला होता. या पथकातील सदस्यांनी लागलीच पोलीस वाहनास फोन करुन त्याबाबत माहिती दिली. त्यांनतर पोलीस वाहन तात्काळ सदर ठिकाणी पोहचले.
पोलीस वाहनांस पाहताच संशयित व्यक्ती बेसावध ग्राम सरंक्षक पथक सदस्याच्या हाताला झटका देवून पळून गेला होता. परंतु त्यापूर्वी या संशयिताचा फोटो काढण्यात आला होता. त्यावरून अमळनेर पोलीस सदर संशयिताचे मागावर असतांना तो प्रशांत जगन वारडे रा.गोरगावले ता.चोपडा अशी प्राथमिक माहीती मिळाली होती. त्याच आधारावर सदर संशयित व्यक्तीचा शोध सुरु होता. परंतु सदर संशयित हा अट्टल चोर असल्याने तो नियमित त्याचे वास्तव्याचे ठिकाण बदलत होता.
दि. २८ मार्च २०२२ रोजी पो.नि. जयपाल हिरे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वरील घटनेतील संशयित हा सुरत राज्य गुजरात येथे लपून बसला आहे. त्यावरुन लागलीच पोना. मिलींद भामरे, पोना. सुर्यकांत साळुंखे, पोकॉ. निलेश मोरे यांचे पथक तयार करुन त्यांना सुचना व मार्गदर्शन करुन तात्काळ सुरत येथे रवाना केले व सदर संशयित चोरास कडोदरा पोलीसांच्या मदतीने कडोदरा पोलीस स्टेशन हद्दीतून अत्यंत शिताफिने ताब्यात घेवून अमळनेर पोलीस स्टेशन येथे परत आले. त्याच्याकडून अमळनेर सदर गुन्ह्यांतील चोरी केलेली हिरो होंडा काढून दिली. यासह त्याने ०३ मोटर सायकल, ०३ लॅपटॉप, ०९ चार्जर, अँण्ड्रॉईड व साधे मोबाईल एकूण ०९, ०२ पितळी समई, ०१ शटर फोडण्याचे / तोडण्याचे कटर चोरीच्या गुन्ह्यात आरोपी प्रशांत जगन वारडे वय २६ रा. गोरगावले ता. चोपडा यांस अमळनेर पो.स्टे. यास गुन्ह्यांत अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीकडून अमळनेर पो.स्टे. कडील ०५ गुन्हा चोपडा शहर पो.स्टे. कडील ०४ गुन्हे उघडकीस आले आहेत. या आरोपीवर यापूर्वी चोपडा शहर पो.स्टे. व सुरत राज्य गुजरात येथे बरेच गुन्हे दाखल असल्याचे समजुन येत आहे.
तसेच सदरचे गुन्हा उघडकीस आणणेकामी पो.नि.जयपाल हिरे यांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोहेकॉ, शरीफखान पठाण, पोना. मिलींद भामरे, पोना. सुर्यकांत साळुंखे, पोना. सिध्दांत सिसोदे, पोकों. निलेश मोरे यांनी हि कामगिरी केली आहे.