भुसावळ प्रतिनिधी । भाजीपाला लिलाव विक्रीतील वादाच्या कारणावरून शहरातील एकावर दोघांनी चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे.
भुसावळ शहरातील आठवडे बाजार भागात भाजीपाला विक्रेत्याला लिलाव ठिकाणी रात्री ८ च्या सुमारास पंचशील नगर भागातील दोघांनी भांडण करून चाकू हल्ला करून दुखापत केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या संदर्भात फिर्यादी पवन मोहन चौधरी (वय ३०, राहणार श्रीराम नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक ९ ऑगेस्ट २०२० रोजी भाजीपाल्याच्या लिलावाच्या कारणावरून आरोपी धम्मा सुरळकर व रितीक नरेंद्र चौधरी राहणार पंचशील नगर या दोघांनी रात्री ८:०० वाजेला फिर्यादी पवन मोहन चौधरी सोबत भांडण करून धम्मा सुरळकर याने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या दंडावर चाकू करून दुखापत केली. या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुरुन ७७१/२०२० भाग-५ भा.द.वि कलम ३२४,३२३, ५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो. ना. निलेश बाविस्कर करीत आहेत.