‘भुसावळ’मध्ये आरोपीला अटक करायला गेलेल्या पोलीसांवरच हल्ला (व्हिडीओ)

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्युज, दत्तात्रय गुरव । आरोपीला अटक करायला गेलेल्या पोलीसांवर आरोपीच्या नातेवाइकाकडून हल्ला करण्यात आल्याची घटना भुसावळमध्ये घडली आहे.

दोन महिन्यापूर्वी एका गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या ‘भुसावळ’ बाजारपेठ पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आरोपीने धक्काबुक्की केली होती, त्या प्रकरणातील पाच आरोपींना अटक करण्यात आली होती, परंतु उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आरोपीच्या नातेवाईकांनी आज हल्ला चढवला आहे, ही घटना भुसावळ शहरामध्ये घडली आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, “दि.२७ नोव्हेंबर २०२१ रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक यांच्यावरती हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता, या गुन्ह्यात एकूण आठ आरोपी त्यापैकी पाच आरोपींना त्यावेळी अटक करण्यात आली होती तीन आरोपी अद्यापही फरार होते. त्यापैकी निखिल राजपूत हा एक आरोपी घरी आल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस त्या आरोपीला अटक करण्यासाठी गेले असता आरोपीच्या नातेवाइकांनी पोलीसांवरही हल्ला चढवला आहे.

त्यामुळे पहिल्या गुन्ह्यात वाढ करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा बाजार पेठ पोलीस स्टेशनला निवड झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

व्हिडीओ लिंक :

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1801464700054956

 

Protected Content