नांद्रा येथे ‘पुलवामा’ घटनेतील शहीद जवानांच्या स्मृतींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण

पाचोरा लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । ‘पुलवामा’ येथील घटनेला चार वर्ष पूर्ण झाले असून तालुक्यातील ‘नांद्रा’ येथील महादेव मंदिराच्या प्रांगणामध्ये शहीद जवानांच्या स्मृतींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

२०१९ साली ‘पुलवामा’ येथे अतिरेक्यांनी ग्रेनाईटचा भ्याड हल्ला केला होता. त्यात आपल्या देशाच्या सेवेचं कर्तव्य बजावतांना ‘बी.एस.एफ.’चे ४२ वीर जवान शहीद झाले होते. या घटनेला चार वर्ष पूर्ण झाले आहे. याप्रसंगी ‘पुलवामा’ झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत तालुक्यातील ‘नांद्रा’ येथील महादेव मंदिराच्या प्रांगणामध्ये शहीद जवानांच्या स्मृतींना उजाळा देत मेणबत्ती व दीप प्रज्वलित करत, फुले वाहत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सामूहिकरीत्या शांती मंत्राचे पठाण करण्यात आले.

यावेळी बी.एस.एफ. जवान विनोद सूर्यवंशी याबरोबरच इतर जवान, माजी सैनिक, तंटामुक्ती अध्यक्ष व महादेव मंदिर संस्थान अध्यक्ष सुभाष बाविस्कर, माजी सैनिक भगवान तावडे, रमेश सूर्यवंशी, विनोद बाविस्कर, सखाराम पाटील, दिलीप सूर्यवंशी, गणेश सूर्यवंशी, मनोज सूर्यवंशी, हिरालाल सूर्यवंशी, मधुकर सूर्यवंशी, राजू कुंभार, पंडित कुंभार, अमृत पाटील, अपंग बंधू विनोद सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब बाविस्कर, संदीप सूर्यवंशी, दामू खैरनार, गावातील पदाधिकारी, गावातील सैन्य दलात कार्यरत सैनिक, यांचे पालक, शिक्षक, पत्रकारबंधू व तरुण मित्र मंडळ यांनी मेणबत्ती व दीप प्रज्वलित करत, फुले वाहत, शांती मंत्र म्हणून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.यशवंत पवार यांनी केले. याप्रसंगी ‘भारत माता की जय, वंदे मातरम, वीर जवान अमर रहे, जय जवान जय किसान या घोषणांनी वातावरण देशभक्तीमय झाले होते.

Protected Content