धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरापासून जवळ असलेल्या बाभळे गावाच्या शिवारात एका पिसाळलेल्या कुत्र्याने एकच दिवशी ७ जणांना चावा घेवून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी ५ मार्च रोजी सायंकाळी ५ ते ७ वाजेच्या दरम्यान घडली आहे. या घटनेतील जखमींना धरणगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
धरणगाव शहरापासून जवळ असलेल्या बाभळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता. धरणगाव तालुक्यातील बाभळे, धानोरा, आनोरा, गारखेडा, गंगापुरी गावातील एकुण ७ जणांना कुत्र्याने चावा घेतला आहे. या कुत्र्याच्या हल्ल्यात सरलाबाई रामकृष्ण पाटील वय-५५, रा. धानोरे ता. धरणगाव, आशाबाई विठ्ठल भोई वय-३५, रा. धरणगाव, नारायण पाटील वय-३३, रा.धरणगाव, तुषार सुनील महाजन वय-१४, रा.धानोरा ता.धरणगाव, उमेश शांताराम पाटील वय-३१, रा. गंगापुरी ता.धरणगाव, राजेंद्र शालीक गजरे वय-३५, रा. बाभूळ आणि मीराबाई जयसिंग भिल वय-५०, रा. बाभळी ता.धरणगाव असे ७ जणांना चावा घेतला आहे. सर्व जखमींना धरणगाव येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या कुत्र्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.