जळगाव प्रतिनिधी । शहरातील बजरंग रेल्वे बोगद्याजवळ अनोळखी 17 वर्षीय तरूणीने आत्महत्या केली होती. आज पहाटे नातेवाईकांना तिचा मृतदेह ओळखला. जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, गायना सुनिल खैरनार (वय-17) रा. त्रिमुर्ती नगर, पिंप्राळा या तरूणीचे घरात किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. रागाच्या भरात रविवारी पहाटे 6 वाजेच्या सुमारास बजरंग रेल्वे बोगद्याजवळ धावत्या सचखंड एक्सप्रेस रेल्वे खाली येवून आत्महत्या केली. हा प्रकार रेल्वे महामार्ग पोलीसांना सकाळी 10 वाजेच्या सुमारास उघडकीस आला होता. त्यावेळी मृतदेह अनोळखी असल्याने लोहमार्ग पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
गायनाची आई गृहिणी असून वडील सुनिल खैरनार हे पनवेल येथे बालाजी कंपनीत रिलायन्स वायरींगचे काम करतात. सकाळी गायना घरातून रागाच्या भरात निघून गेल्यानंतर तिच्या आईने पती सुनिल खैरनार यांना घटनेची माहिती दिली. मुलगी घरातून काहीही न सांगता घरातून निघून गेल्याचे समजता त्यांनी पनवेलहून जळगावला सायंकाळी आले. घरातून गायब झालेली गायनाची शोधाशोध सुरू झाला. नंदनीबाई वामनराव मुलींचे विद्यालयात 11 वीला शिकत होती. शाळेतील तिचे मित्र व मैत्रिणींच्या घरी शोधाशोध सुरू केली. रात्री उशीरापर्यंत मिळून आली नाही. आज सोमवारी पहाटे वर्तमान पत्रात गायना खैरनारचा चुलत भाऊ श्याम सोनवणे याला समल्यानंतर नातेवाईकांन सकाळी 9 वाजता जिल्हा रूग्णालयात धाव घेतल्यानंतर मृतदेह हा गायनाचा असल्याचे ओळखले. मुलीचा मृतदेह पाहताच आईवडीलांना हंबरडा फोडला होता. शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.