खामगाव प्रतिनिधी । गणेशोत्सव निमित्त शहरातील गणेश कोचिंग क्लासेसतर्फे विद्यार्थ्यांसाठी अथर्वशीर्ष पाठाचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम पूजनीय देवता गणपती भक्तांचे सर्व संकट दूर करतात. गणोशोत्सव दरम्यान भक्त गणेश भक्तीत मग्न असतात अशात देवाला प्रसन्न करण्यासाठी पूजन, स्तोत्र पाठ आणि मंत्रोच्चारण करावे. सोबतच गणपती अथर्वशीर्ष स्त्रोताचा पाठ करणे फलदायी ठरतं. याचे पाठ केल्याने व्यक्तीच्या दु:खाचा अंत होतो. सर्व सिद्धी प्राप्त होते. तसेच पाठ करताना पूजन करुन गणरायाला सुगंध, अक्षत, पुष्प, धूप, दीप व नैवेद्य दाखवावा. सोबतच गणपतीला प्रिय दूर्वा अर्पित कराव्या. लाल फुलांची माळ अर्पित करावी. याने घरात सुखाचे आगमन होतं. उच्चारण स्पष्ट असावं. याकरिता आज विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबत अध्यात्माचे महत्त्व देखील असावे या या उदात्त हेतूने खामगाव येथील श्री गणेश कोचिंग क्लासेस च्या वतीने एक दिवसीय गणपती अथर्वशीर्ष पठण करण्यात आले.
धोरणाच्या प्रादुर्भावामुळे काही निवडक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता यामध्ये सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्ष पठण केले गणपती आरती पूजन नंतर कार्यक्रमाचा समारोप झाला अत्यंत शिस्तबद्ध व कोणाचे नियमांचे काटेकोर पालन करून हा उपक्रम विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण वातावरणात सादर केला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणपती विसर्जना च्या दिवशी निर्माल्य एकत्रीकरण करून त्याचे सेंद्रियखत रूपांतर करीत पर्यावरण पूरक उपक्रम राबवणार असल्याचे संस्थाचालकांनी सांगितले. याकरता संस्थाचालक विपुल चांडक सर, चारुदत्त नेरकर सर विद्यार्थ्यांमध्ये अमेय सराफ ,श्रद्धा पाचपोर ,वेदांत वानखेडे विभूति चोपडे ,प्रतिक्षा मठे ,ऋषिकेश शेजुळे दामिनी चौकसे ,भुतडा ओमकार व्यवहारे प्रवीण जोशी चिन्मय मुंडढा रोहन भट्टड वृषाली माडीवाले समीक्षा डहाके अश्विनी रौंडले यांनी सहभाग घेतला होता.