चोपडा प्रतिनिधी । येथील वनविभागाच्या कार्यालयात नुकतीचे शेतक-यांसाठी केंद्र व राज्य सरकारची बांबू लागवड योजना संदर्भात बैठक घेण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव, धुळे, नंदुरबार शहराचे नियुक्त अधिकारी आर.डी.पाटील यांनी या योजनेबद्दल शेतक-यांना मार्गदर्शन केले आहे. तसेच चोपडा वनअधिकारी पी.बी.पाटील, पारोळा येथील श्री माळी यांनी बांबूच्या जाती, अनुदान, लागवडपध्दत आणि उत्पादन नंतरच्या प्रक्रिया, उपलब्ध बाजार पेठ, तसेच शासनाच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांना देऊन या सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. याप्रसंगी तालुक्यातील शेतकरी बांधव, वकील सोनवणे, भारडू डॉ. सुभाष देसाई, चोपडा डॉ. निकम, माचला कुलदीप पाटील, विरवाडे दिनेश वाघ, बुधगाव पी.एम. पाटील, चहार्डी येथील भागवत महाजन, चुंचाळे बोरसे, वेढोदा तसेच तालुक्यातून अनेक शेतकरी उपस्थितीत होते.