पहूर, ता.जामनेर, प्रतिनिधी | आज सोमवार दि. २१ रोजी झालेल्या जामनेर विधानसभा मतदारसंघात पहूर येथे किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार पडले. मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या.
पहूर पेठ येथे ८९९१ पैकी ५६२६ म्हणजेच ६२.५५ टक्के मतदान झाले. पहूर कसबे येथे ६४८९ पैकी ४५८१ म्हणजे ७० टक्के तर सांगवी येथे ४५३ पैकी ३७०( ८१.६७ टक्के) मतदान झाले. खर्चाणे येथे ४७४ पैकी ३९८ म्हणजे ८३.९६ टक्के मतदान झाले आहे. मतदान शांततेत पार पडले. यावेळी पहूर पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिह परदेशी, सहाय्यक फौजदार अनिल अहिरे, जितेंद्र परदेशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.