Home Cities अमळनेर मंगरूळ येथे अज्ञात दोघांनी गुराच्या चाऱ्याला लावली आग; गुन्हा दाखल

मंगरूळ येथे अज्ञात दोघांनी गुराच्या चाऱ्याला लावली आग; गुन्हा दाखल

0
27

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील मंगरूळ रोडवरील शेत शिवारातील शेतकऱ्याच्या चाऱ्याच्या ढिगाला अज्ञात व्यक्तींनी आग लावून दिल्याची घटना गुरूवारी सकाळी ६ वाजेल्या उघडकीस आली आहे. यात सुमारे २५ हजार रूपयांचे नुकसान झाले असून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, दिनेश मुरलीधर पाटील (वय-४१) रा. मंगरूळ ता. अमळनेर हे शिक्षक आहे. त्यांचे अमळनेर धुळे रोडवरील मंगरूळ शेत शिवारात शेती आहे व तेथेच गुरांसाठी खळे असून चाराही त्याच ठिकाणी ठेवतात. गुरूवार २४ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास अज्ञात दोन व्यक्तींनी द्वेशापोटी २५ हजार रूपये किंमतीचा चारा पेटवून दिला व दुचाकीने दोघांनी पळ काढला. दरम्यान या आगीच चारा पुर्णपणे जळून खाक झाला आहे. याप्रकरणी दिनेश पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुभाष महाजन करीत आहे.


Protected Content

Play sound