मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत डॉ . उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथील विद्यार्थ्यांनी प्रेरणा बाविस्कर, दिप्ती चऱ्हाटे, समृद्धी कडू, कल्याणी महाले, तेजस्विनी निकम, खुशबु पाटील, दीक्षा सोनवणे, स्नेहल इरसे यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत कोथळी येथे शेतकऱ्यासाठी बँकेचा प्रस्ताव तयार करण्याचे प्रात्यक्षिक केले.
कृषी क्षेत्रात विस्तारीकरण किंवा अनुकूल नवीन तंत्रज्ञानासाठी पत ही शेतकऱ्याची मूलभूत गरज आहे. गावपातळीवर विविध बँका शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे कर्ज किंवा मध्यम मुदतीच्या कर्जासाठी पीक कर्ज म्हणून कर्ज सुविधा देतात.शेतकरी जमीनदार किंवा सावकाराकडून कर्ज घेतात आणि या कर्जावर खूप जास्त व्याज असते. या प्रात्यक्षिकामुळे शेतकऱ्यांना बँकेची भूमिका समजण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांनी बँकेच्या प्रस्तावाचा अवलंब केला आहे. या कार्यक्रमाकरिता प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समनव्यक प्रा. बी. एम. गोणशेटवाड, कार्यक्रम प्रा.ए डि मत्ते व समन्वयक यांचे मार्गदर्शन लाभले.