यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील दहीगाव येथे पारंपरिक पद्धतीने एकाच तरुणाने अकरापैकी ११नारळ तोडून त्याचे कौतुक होत आहे. दहीगाव व परिसरात रात्री पासुन पाऊसाची रिपरिप सुरूच होती, दिवसा पाऊस उघपीस आल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला व पारंपरिक पद्धतीने पोळा सण साजरा केला दुपारी बारा वाजेच्या दरम्यान प्रमुख चौकात ग्रामपंचायत तर्फे अकरा नारळाचे तोरण बांधण्यात आले. या धोरणाचे नारळ तोडण्यासाठी तरुणांनी उत्साह दाखवला यात चेतन भूषण पाटील या तरुणाने अकरापैकी ११ नारळ तोडली व दहीगाव चा इतिहासात विक्रम केला त्याला सहकार्य म्हणून विपुल दीपक पाटील व सर्जा होता.
राजेंद्र जीवराम पाटील यांचा चेतन पाटील चे सर्वत्र कौतुक केले जात आहे. गावातील बहुसंख्य तरुणांनी यात सहभाग घेतला होता आणि सण शांततेत पार पाडण्यासाठी दहीगाव बिटचे हवालदार राजेंद्र पवार व होमगार्ड बंधूनी परिश्रम घेतले. दरम्यान पोळा फोडण्याचा कार्यक्रम आटोपल्यावर नारळ तोडणारा चेतन भूषण पाटील याचा झंकार मित्र मंडळ तर्फे भव्य सत्कार करण्यात आला व गावातून मिरवणूक काढण्यात आली याकरिता झंकार ऊऊ मंडळात: मयूर पाटील, भूषण पाटील, विपुल पाटील, मयूर पाटील, तेजस पाटील, विवेक पाटील, शिवाजी पाटील, भूपेंद्र पाटील, पप्पू चंद्रकांत पाटील, हर्षल पाटील, हेमंत पाटील, भरत कोळी, वासुदेव पाटील, सुभाष पाटील, किरण पवार, विशाल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, जयश्री खंबायत, निलेश पाटील यांनी सहभाग घेतला.